जळगाव जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे दोन महिन्यापासून पगार रखडले आहे. त्यामुळे नाराजी व्यक्त हाेत आहे. शिक्षकांचे पगार हे एक तारखेला करणे हा अध्यादेश शासनाने जारी केला आहे; मात्र आजवर या अध्यादेशांची अंमलबजावणी केलेली नाही. लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे ऑनलाईन पद्धतीने काम सुरु आहे. ऑगस्ट व सप्टेंबरचे वेतन अद्याप न झाल्यामुळे शिक्षकांपुढे कर्जासह विविध हफ्ते भरणे कठिण झाले असल्याची तक्रार शिक्षकांमधून केली जात आहे. पगाराचे बिले ही अर्थ विभागातून पडून आहे, ती कोषागारात पाठवून बिले तात्काळ अदा करण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे.
