जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण रखडले

Jalgaon Social कट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> जिल्हा परिषदेतर्फे ग्रामसेवकांना दिले जाणारे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार चार वर्षांपासून रखडले आहेत. यातील तीन वर्षांतील पुरस्कारांची यादी अंतिम झाली आहे, मात्र जाणीवपू‌र्वक वितरणास विलंब केला जात आहे. यामुळे हे पुरस्कार वितरण तत्काळ करावे, अन्यथा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामसेवक युनियनने दिला आहे.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे ग्रामसेवकांना पुरस्काराने सन्मानित केले जाते. मात्र २०१५ नंतर या पुरस्काराचे वितरण झालेले नाहीत. यंदा तीन वर्षांतील प्रत्येक तालुक्यातून एक अशा ४५ पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार होते. यासंबंधीची तयारीही प्रशासनाने केली आहे. मात्र कोरोना संसर्गजन्य स्थितीमुळे हे पुरस्कार रखडले आहेत, असे ग्रामसेवक युनियनचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *