जि.प. सदस्यांनी घेतली खर्ची येथील डॉक्टर कोरोना योद्धांची दखल!

Social कट्टा कट्टा

एरंडोल गोपाल मराठे प्रतिनिधी (खर्ची बु) >> रिड जळगाव या ऑनलाईन बातमी पोर्टलने खर्ची येथील सर्व डॉक्टर कोरोना योध्दाच ! ही बातमी आज सकाळी प्रकाशीत केली. बातमीचे गाभीर्य लक्षात घेत एरंडोल तालुक्यातील विखरण-रिंगणगाव गटातील जिल्हा परिषेद सदस्य नानाभाऊ महाजन यांनी स्वःखर्चातुन कोरोना पासुन गावातील डॉक्टरांचे संरक्षण व्हावे म्हणुन पी.पी.इ. किट दिले. तसेच संत श्री सावता महाराज पुण्यतिथी निमित्त मा. नानाभाऊ महाजन यांनी गावाला भेट दिली व काचमाळी समाज मंगल कार्यालयात संत सावता महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन कले. या प्रसंगी अशोक मराठे (मराठा समाज अध्यक्ष खर्ची), उत्तम इंधा महाजन (काचमाळी समाज अध्यक्ष खर्ची) तसेच गावातील नागरीक उपस्थित होते. यावेळी नानाभाऊ यांनी रिड जळगाव या बातमी पोर्टल ने दिलेल्या बातमीचे स्वागत देखील केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *