यावल शहरातील मद्यप्रेमींसाठी खुशखबर ; मद्यविक्री झाली सुरु…

यावल सिटी न्यूज

यावल प्रतिनिधी : > शहरात सोमवारपासून मद्य विक्री तसेच बियर शॉपी उघडण्यात आल्या. जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत मद्यविक्री केली जाणार आहे. या निर्णयाचे अनेक मद्यप्रेमींनी स्वागत करत बियर शॉपीसमोर गर्दी केली.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने बंद होती. दरम्यान, तिसऱ्या लॉकडाऊनमध्ये एक दिवस दुकाने उघडली. मात्र ग्राहकांनी केलेल्या प्रचंड गर्दीमुळे कोरोना संसर्गाची वाढलेली भीती पाहता दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये पुन्हा मद्य विक्री व बियर शॉपी सुरु करण्यात आल्या आहे. मात्र कमीत कमी गर्दी, फिजिकल डिस्टसिंगच्या नियमांचे पालन आणि तोंडला मास्क लावून येणाऱ्यांच बियर किंवा मद्य विक्री करू असा पवित्र विक्रेत्यांनी घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *