राज्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला सन २०२०-२१ या चालू वर्षांकरिता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ मिळण्याबाबत विश्व मराठा संघ यावल तालुक्यातर्फे तहसीलदार यावल यांना निवेदन देण्यात आले!
रिड जळगाव टीम ::> विश्व मराठा संघ यावल तालुका यांच्या वतीने मराठा आरक्षणावरील स्थगिती रद्द करण्यात यावी व राज्याच्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला सन २०२० – २१ या चालू वर्षांकरिता शिक्षण व शासकीय सेवांमध्ये लाभ मिळवा यासाठी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आरक्षण लागू होईपर्यंत मराठा समाजाला विविध सवलती आणि योजना लागू कराव्यात, जेणेकरुन मराठा समाजाला आपली प्रगती साध्य करता येईल.
खास करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक फी सवलत, शिष्यवृत्ती, हॉस्टेलची सुविधा, विशेषतः दुर्गम भागातील मुलांना इतर समाजाप्रमाणे हाॅस्टेलची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच नामांकित शाळांमध्ये गरीब आणि दुर्गम भागातील मराठा मुलांना खास बाब म्हणून प्रवेश देण्याबाबत सरकारने निर्णय घ्यावा. असे निवेदनात नमूद केले आहे.
प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे- 1) मा. सवोच्च न्यायालयाच्या स्थागितीच्या निर्णयावर फेरविचार याचिका दाखल करुन स्थगिती उठवण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
2) राज्याला असलेल्या घटनात्मक अधिकारांचा वापर करुन मराठा समाजाला शिक्षण आणि शासकीय सेवांमध्ये लागू असलेले SEBC आरक्षण अखंडित ठेवण्यासाठी त्वरीत अध्यादेश काढावा.
३) मराठा आरक्षण स्थगितीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत मराठा समाजाच्या वाटयाला येणाऱ्या शासकीय नोकर भरतीमधील सर्व जागा रिक्त ठेवण्यात याव्यात किंवा सर्व प्रकारच्या नोकर भरती स्थगित करण्यात याव्या.
४) ओबीसी समाजाला इंद्रा सहानी निकालाचे निकष डावलून कोणत्याही प्रकारचे सर्वेक्षण न करता देण्यात आलेली मुदतवाढ देखील २०१९ मध्ये संपलेली असून ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न यामुळे निकाली निघू शकतो याबाबत भूमिका स्पष्ट करावी, आरक्षण लागू होईपर्यंत मराठयांसाठी विशेष योजना लागू करा. या संविधानिक मागण्या निवेदनात मांडण्यात आल्या आहे.
आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकारने तातडीने पाऊले उचलून ठोस कृती करावी, अन्यथा मराठा सामाजाच्या रोषाला सामोरे जावे असा इशारा निवेदनात देण्यात आल आहे.
यावेळी विश्व मराठा संघ यावल तालुकाध्यक्ष तुषार राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष गोविंदा गोपाळ पाटील, युवक तालुका अध्यक्ष प्रतीक ज्ञानेश्वर पाटिल, सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत राजेंद्र पाटील फैजपूर, देवेंद्र माधव पाटील न्हावी, महेश राजेंद्र पाटील कोरपावली आदी उपस्थित होते.