यावल-वढोदेजवळ ट्रक-दुचाकीच्या धडकेत युवक ठार

अपघात क्राईम यावल साकळी

यावल प्रतिनिधी >> यावल-चोपडा रस्त्यावरील वढोदा गावाजवळ शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता दुचाकी व ट्रकचा अपघात झाला. त्यात दुचाकीस्वार २२ वर्षीय तरुण ठार झाला. सागर उर्फ यश विलास कोळी (रा.बोरले नगर, यावल) असे मृताचे नाव आहे.

बाबूभाई मंगाभाई झाला (रा.सुलतानाबाद जि.जुनागड, गुजरात) हा शनिवारी सायंकाळी साडेपाचला अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्य मार्गावरून यावलकडून चोपड्याकडे ट्रकने (क्रमांक जीजे.०३-बीव्ही.७३७२) जात होता. तर सागर उर्फ यश विकास कोळी हा आर-१ ही स्पोर्ट बाईक घेऊन चोपड्याकडून यावलकडे येत होता.

वढोदा गावाजवळ दुचाकी व ट्रकचा अपघात झाला. यामध्ये सागर उर्फ यश कोळी हा गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने जळगाव येथे खासगी दवाखान्यात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाला. धनराज भावलाल सोनवणे यांच्या तक्रारीनुसार ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करत आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली.