Video : यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे अचानक लागली आग ; लाखांचे नुकसान

यावल सिटी न्यूज

साकळी प्रतिनिधी > यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथे ग्रामपंचायतीच्या जागेवर गावातील शेतकरी मारोती नामदेव पाटील व जानकीराम नामदेव पाटील यांच्या पत्र्याच्या शेडला आग लागल्याने चाऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आग ही साधारण १२ वाजेच्या सुमारास लागल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ; यावल तालुक्यातील थोरगव्हाण येथील ग्रामपंचायतच्या जागेवर असलेला पत्र्याच्या शेडातील चाऱ्याला अचानक आग लागल्याचे समजते. शेतकरी मारोती पाटील व जानकीराम पाटील यांच्या खळ्याला आग लागल्याने अंदाजे दीड ते दोन लाखाचा चारा खाक झाल्याने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील मंडळींनी अनेक प्रयत्न केले असता आग विझली जात नव्हती..तेव्हा यावल शहरातील अग्निशमन दलला बोलवण्यात आले आहे. जवळपास आग ही दोन ते तीन तास लागली असल्याने लवकर आटोक्यात येणे शक्य नव्हते..आग कशी लागली याची माहिती अजूनही समजलेली नाही. परंतु गावाच्या बाहेरील बाजूस कोणीतरी सकाळी काट्या पेटवून तिथून पळ काढला व ती आग गावाकडे येण्यास सुरुवात झाल्याने चाऱ्याच्या खळ्यास आधी आग लागली. ती आग आटोक्यात आणण्यासाठी गावातील तलाठी एस.एस.तायडे, पोलीस पाटील, अग्निशामक दल व काही ग्रामस्थ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *