यावल तालुक्यातील ४७ ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

निवडणूक यावल

यावल प्रतिनिधी >> तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी येथील तहसीलदार महेश पवार यांनी अधिसूचना जाहीर केली. तसेच संपूर्ण ग्रामपंचायत निहाय निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक देखील करण्यात आली.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या सोमवारी प्रसिद्ध झाल्या होत्या. तर आता निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील त्या -त्या गावांमध्ये तलाठी कार्यालयात ही निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.

तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, नायब तहसीलदार आर.डी. पाटील, मुख्तार तडवी आदींच्या हस्ते निवडणूक निर्णय अधिकारी यांना नियुक्ती पत्र वाटप करून निवडणुकीचा बिगुल वाजला आहे.