कृषी विधेयकाविरुद्ध यावलला आज आंदोलन

Politicalकट्टा आंदोलन कट्टा यावल शेती

यावल प्रतिनिधी >> येथील तहसील कार्यालयासमोर गुरूवारी कृषी विधेयकांविरुद्ध काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन केले जाणार आहे. उत्तर भारतातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा हे आंदोलन केले जाणार आहे.

आमदार शिरिष चौधरी आंदोलनाचे नेतृत्व करतील. माजी आमदार रमेश चौधरी, जिल्हा परिषदेचे गटनेता प्रभाकर सोनवणे, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर चौधरी, पंचायत समितीचे गटनेता शेखर पाटील उपस्थित राहणार आहेत. उपस्थितीचे अवाहन कॉँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, सेवा फाऊडंशेनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी केले आहे.