सावखेड्यातील 42 वर्षीय इसमाची आत्महत्या

यावल सिटी न्यूज

यावल : तालुक्यातील सावखेडासीम येथील गोकूळ किसन पाटील (42) यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याने गावात खळबळ उडाली. घटनास्थळी हवालदार असलम खान, सिकंदर तडवी दाखल झाल्यानंतर मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला तर या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. मृताच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परीवार आहे. घटना घडली तेव्हा मृताची पत्नी मुलांसह धरणगाव येथे गेल्याचे सांगण्यात आले. तपास हवालदार असलम खान, सिकंदर तडवी करीत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *