यावल-साकळी-किनगाव रस्ता दुरुस्तीस अखेर प्रारंभ

किनगाव यावल रिड जळगाव टीम साकळी सिटी न्यूज

साकळी >> यावल तालुक्यातील यावल-साकळी-किनगाव रस्त्याची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. यासंदर्भात ‘रिड जळगाव’ ने ९ नोव्हेंबरला बातमी दिली होती. त्याची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची दुरूस्ती सुरु केली आहे. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राज्यमहामार्गाअंतर्गत यावल-साकळी-किनगाव दरम्यानचा १५ किमीचा रस्ता खड्डेमय झाला आहे. साकळी ते गिरडगाव दरम्यानचा रस्त्यावर यामुळे अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या. त्यामुळे ‘रिड जळगाव’ने समस्या मांडताच सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावलने, रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे. या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत असून डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची समस्या दूर होणार असून, अपघातांवरदेखील नियंत्रण येणार आहे.