अल्पवयीन मुलाकडून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग; यावल पोलिसांत गुन्हा दाखल

किनगाव क्राईम निषेध पाेलिस यावल

डांभुर्णी प्रतिनिधी >> यावल तालुक्यातील डांभुर्णी येथे एका चौदावर्षीय अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केला. गेल्या आठवडाभरापासून सदर मुलाने या मुलीचा वारंवार पाठलाग करून ‘आपण तुझ्यावर प्रेम करतो’ असे सांगत स्वतः आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे.

डांभुर्णी येथील रहिवासी अल्पवयीन मुलीने या संदर्भात फिर्याद दिली. त्या नुसार गेल्या आठवडाभरापासून गावातील एक अल्पवयीन मुलाने तिचा पाठलाग करून ‘मी तुझ्याशी खूप प्रेम करतो असे सांगून तू पण माझ्याशी प्रेम कर. मी तुला मोबाईल घेवून देईल’ असे सांगितले. त्यास नकार दिला असता त्या अल्पवयीन मुलाने स्वतःच्या हात हातावर ब्लेड मारून आत्महत्येचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

पीडित मुलीने कुटुंबीयांना हा प्रकार सांगितल्यानंतर तिला विदगाव, ता.जळगाव येथे पाठवण्यात आले. मात्र तिथे देखील गुरुवारी हा मुलगा जाऊन पोहोचला. तेव्हा मुलगी व तिच्या कुटुंबीयांनी थेट येथील पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. अखेर या प्रकरणी त्या अल्पवयीन मुलाविरुद्ध विनयभंगासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.