यावल तालुक्यातील रोजगार हमी योजने अंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करा ; रिपाईची मागणी

Politicalकट्टा कट्टा यावल

यावल प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून रोजगार हमी योजने अंतर्गत विविध विकास कामामध्ये लाखो रुपयांचा गैरव्यवहार घडला असून याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातीत जिल्हा परिषदचे मुख्यधिकारी डॉ. बी.एन.पाटील यांनी कसून चौकशी करावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले गट) चे युवा शाखेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गोवर्धन तायडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, दिलेल्या निवेदनात म्हटल्यानुसार, अशोक तायडे यांनी म्हटले की, यावल पंचायत समितीच्या माध्यमातुन शासकीय पातळीवर रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्यातील उंटावद, पिळोदा, मनवेल, निमगाव, राजोरा, अंजाळे, वाघळुद, मारूळ, सांगवी बु॥, चिखली बु॥, आणि अट्रावल या ग्रामपंचायतीच्या वतीने २०१९ते २०२०या कालावधीत विविध कामांसाठी लाखो रूपयांचा शासकीय निधी प्राप्त झाले होते. मात्र, यावल तालुक्यातीत उपरोक्त या ग्रामपंचायतीच्या सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांनी संगनमत करून रोजगार हमी योजनेच्या कामात मोठमोठे श्रीमंत आणि बागायतीदार शेतकरी लोकांना मजुर दर्शवुन खोटे मास्टर तयार केले. याचा मोठया प्रमाणावर दुरूपयोग करून लाखो रुपयांचा भ्रष्ठाचार केले असुन यासंदर्भात तालुक्यात झालेल्या अशा प्रकारच्या बोगस आणी थातुर-मातुर कामांची माहिती चौकशी मागितली असता संबंधीत अधिकारी हे उत्तर देतांना सांगतात की, या सर्व रोजगार हमी योजनेच्या कामात गटविकास अधिकारी यांचा देखील आर्थिक सहभाग असुन ते देखील भ्रष्टाचारामध्ये शामिल असल्याने तुम्हाला कुठलीही माहीती मिळु शकणार नाही.

तरी तुमच्या तक्रारीची कुठही दखल घेतली जाणार नसुन तुमच्या कडून होईल ते करा, असे बोलतात. तरी वरिष्ठ पातळीवर तात्काळ पंचायात सामितीचे गटविकास अधिकारी, ग्रामसेवक आणि सरपंच या सर्वांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस भ्रष्टाचाराच्या कामांची चौकशी कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया ( आठवले गट ) च्या युवा शाखेच्या जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अशोक गोवर्धन तायडे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.