Yawal News : वन कर्मचार्‍यांवर गोळीबार करणारे परप्रांतीय आदिवासी अटकेत…

यावल रावेर सिटी न्यूज

यावल > तालुक्यातील लंगडा आंबा क्षेत्रात वन कर्मचार्‍यांवर गोळीबार करणार्‍या परप्रांतीय आदिवासींना आज अटक करण्यात आली आहे. या संदर्भात पोलीस सुत्रांकड्रन मिळालेली माहीती अशी की यावल तालुक्यातील कार्यक्षेत्रात असलेले सातपुडा अभयारण्य लंगडा आंबा ( जामन्या गाडर्‍या ) क्षेत्रातील कक्ष क्रमांक १९ मध्ये काही परप्रांतीय लोक बेकायद्याशीर जंगलात शिरून वृक्षतोड करून अतिक्रमण करण्याच्या बेतात असतांना वन विभागाच्या अधिकारी यांनी त्यांना अटकले होते. यानंतर त्यांनी वनविभागाच्या पथकावर गोळीबार केला होता. नंतर हे सर्व परप्रांतीय आदीवासी आरोपी घटनास्थळावरून अनेर नदीच्या मार्गाने मध्य प्रदेश राज्यात पळून जाण्यात यशस्वी झाले होते.

या संदर्भात यावल पोलीस स्टेशनला या संदर्भात २२ अज्ञात परप्रांतीय घुसखोर लोकांच्याविरुद्ध दंगली सह विविध गुन्हे दाखल करण्यात आला होते . या गुन्ह्यातील मागील काही दिवसांपासुन पोलीसांना गुंगारा देत असताना आरोपीच्या शोधकामी यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार , पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने अखेर आरोपींचा शोध घेत दि.१५ मे रोजी सातपुडयातील अतिदुर्गम श्रेत्र लंगडा आंबा ( जामन्या गाडर्‍या ) या अभयारण्यातुन आरोपी राजा सुरामल बारेला, भाईराम छेदा बारेला, गुलासिंग नाथ्या पावरा, बावर्‍या बारेला, सायमल थावा भिलाला, खांडा गोंडा बारेला, संजय रेनसिंग बोरला, गुंजार्‍या धनसिंग बारेला यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *