यावल तालुक्यातील २४ वर्षीय विवाहितेचा छळ, सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

क्राईम यावल सिटी न्यूज

यावल ::> तालुक्यातील अंजाळे येथील माहेर असलेल्या २४ वर्षीय विवाहितेला मारहाण, शिविगाळ केल्याने सासरच्या पाच जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला. पूनम युवराज तायडे (वय २४, रा. मांगलवाडी, ता.रावेर, ह.मु.अंजाळे) यांनी या संदर्भात फिर्यादी दिली अाहे. त्यावरुन यावल पोलिसांत पती युवराज सिताराम तायडे, सासरे सिताराम चावदस तायडे, सासू इंद्रायणी सिताराम तायडे, नणंद कविता विनोद सोनवणे (रा.गोजोरे, ता.भुसावळ), सरला राहुल कोळी (रा.कोळीवाडा, जुना सातारा, भुसावळ) यांच्याविरुद्ध मानसिक व शारिरिक छळ केल्याचा गुन्हा दाखल झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *