यावल ::> ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेंटीस तर्फे यावल तालुक्यात आज दिनांक 9 सप्टेंबर रोजी बेरोजगार रेल्वे अप्रेंटीस युवकांनी रेल्वे खाजगिकरण तसेच रेल्वे मध्ये अप्रेंटीस केलेल्या युवकांना रेल्वे मध्ये पक्का रोजगार मिळावा यासाठी ठीक 9 वाजुन 9 मिनिटाला मशाल आंदोलन तसेच मोबाईल टॉर्च व मेणबत्ती पेटवून सरकार ला मागणी केली.
या पूर्वीच्या प्रत्येक रेल्वेमंत्र्यांनी रेल्वे अप्रेंटीस पक्का रोजगार दिला तर आताचे रेल्वे मंत्री का रोजगार देऊ नाही शकत असा प्रश्न उपस्थित करण्यात आला, रेल्वेचे खाजगीकरण झाल्यास याचा सर्वात जास्त नुकसान हे सामान्य जनतेचे होणार आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन सामान्य जनतेने सुद्धा या रेल्वे खाजगिकरनाचा विरोध करावा असे आवाहन ऑल इंडिया रेल्वे ऍक्ट अप्रेंटीस असोशियान तर्फे करण्यात आले.
तसेच यावल रावेर मतदार संघाचे आमदार शिरीषदादा चौधरी व यावल नगरपालिकेचे नगरसेवक प्राध्यापक श्री मुकेश येवले यांनी ट्विटरवर #मशालआंदोलन_रेलअप्रेंटिस असे ट्विट करून या मशाल आंदोलनास पाठिंबा दिला.
या आंदोलनात यावल शहरातील सचिन बारी,जयवंत माळी, अनिकेत सोरते,लक्ष्मण अढळकर,रामदास बारी, दर्शन महाजन, जीवन महाजन, निलेश न्हावकर, विशाल बारी आकाश माळी राहुल पाटील तसेच तालुक्यातील बरेच बेरोजगार रेल्वे अप्रेंटीस युवक उपस्थित होते.