यावल येथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी जाहीर

Politicalकट्टा कट्टा यावल

यावल ::> राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची यावल तालुका व शहर कार्यकारिण्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राजेश वानखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष रोहण सोनवणे, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, तालुकाध्यक्ष प्रा.मुकेश येवले, युवक अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अध्यक्ष राकेश सोनार, शहराध्यक्ष लखन पवार यांनी कार्यकारिणी जाहीर केली.

या कार्यकारिणीत तालुका उपाध्यक्षपदी गौरव भोईटे, संजय पाटील, योगेश चौधरी. सरचिटणीसपदी रोहित बाविस्कर, परेश साठे, रोहित पाटील, कल्पेश पाटील, संघटकपदी अल्ताफ पटेल, राधे कुंभार, किरण महाजन, कार्याध्यक्षपदी महेंद्र तायडे, प्रसिद्धी प्रमुखपदी गुलशन धांडे, महाविद्यालय प्रमुख आकाश महाजन तर कार्यकारिणी सदस्य म्हणून आमिन खान, शाहरुख तडवी, तयुब तडवी, मनीष पाटील, प्रशांत राजपूत, मोहन पाटील, विशाल पाटील आदींची निवड केली आहे.