मूलबाळ होत नसल्याले यावल तालुक्यातील किनगावात पतीसह चौघांची विवाहितेला मारहाण

किनगाव क्राईम निषेध यावल सिटी न्यूज

किनगाव प्रतिनिधी ::> यावल तालुक्यातील किनगाव बुद्रुक येथील ३२ वर्षीय विवाहितेला तिच्या पती, सासू व दिर, दिराणी यांनी मारहाण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना सोमवारी सकाळी घडली.

किनगाव बुद्रुक ता. यावल येथील रिता उर्फ रत्ना तुषार राणे वय ३२ या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादी नुसार सोमवारी सकाळी पाऊने आठ वाजेच्या सुमारास फिर्यादी पावणे मुल बाळ होत नाही. या कारणाने तिचे पती तुषार गोपाळ राणे, सासू आशाबाई गोपाळ राणे, दीर बाळु गोपाळ राणे व दिराणी सविता बाळु राणे यांनी तिला घरात कोंडून तिला जबर मारहाण केली त्यात तिच्या तोंडावर, डाव्या हाताच्या कानेवर जबर दुखापत झाली. या प्रकरणी वरील चौघांविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला.