Video : यावल शहरात जनता कर्फ्यूचे उल्लंघन; दुकाने सुरूच…प्रशासनाचे दुर्लक्ष

यावल सिटी न्यूज

यावल : दि. २२ मे रोजी शहरातील अनेक भागात बंदी असताना मात्र बुरुज रस्त्यावर काही दुकाने व लोकांची गर्दी होती. याकडे यावल महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांचे दुर्लक्ष तर होत नाही न असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाने सर्व जगाला हैराण करून सोडले असताना यावल शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने शिरकाव घातला असून नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवल्याचे चित्र यावल शहरासह तालुक्यात दिसत आहे.मात्र प्रशासन यावर कोणतीही कारवाई करताना दिसत नाही असा सूर जनतेतून निघत आहे.

शहरात अनेक ठिकाणी दुकाने सुरु आहेत. यावल मध्ये जनता कर्फ्यू चे पालन कोणीही करताना दिसत नाही. असा एक व्हिडियो रिड जळगाव या ऑनलाईन वृत्त वाहिनीकडे आला आहे. तसेच तालुक्यात अनेक ठिकाणी बाहेर गावातील लोक येत आहेत…तरीही नागरिक माहिती देत नसल्याचे आढळून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *