यावलात एकास १० ते १५ जणांकडून बेदम मारहाण

क्राईम यावल

यावल प्रतिनिधी >> येथे गाळ वाहतुक बंद पुकारण्यात आले असता वाहतुकीचे ट्रॅक्टर भरण्यासाठी गेलेल्या एका तरूणास १०ते १५ जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असुन याबाबत पोलीसात मात्र गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीद्वारे कळते.

याबाबत मिळालेली माहीती अशी यावल शहरातील गाळ वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांनी मजुरी वाढवुन मिळावी यासाठी मागील दोन दिवसांपासुन आपली ट्रॅक्टरद्वारे होणारी गाळ वाहतुक पुर्णपणे बंद केली आहे. आज दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी सकाळच्या सुमारास यावल शहरातील बाहेरपुरा परिसरातील राहणारे ट्रॅक्टर चालक भरतसिंग दरबारसिंग सिसोदीया (वय ४० वर्ष) हे आपले ट्रॅक्टर घेवुन गाळ वाहतुकीस गेले असता वाहतुक बंद असतांना वाहन घेवुन जाणाऱ्या इतर वाहनधारकांमध्ये शाब्दिक चमकमक झाल्याने या चकमकीचे रूपातंर वादात झाल्याने बोरावल गेट परिसरात भरतसिंग सिसोदिया यांना या ठिकाणी जमलेल्या १०ते १५ जणांनी कडुन एकत्र येवुन बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली.

या मारहाणीत जखमी झालेल्या सिसोदिया यांना यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता प्रथमपचार केल्यावर त्यांना भुसावळ् येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असुन या संदर्भात मात्र यावल पोलीस स्टेशनमध्ये कुणाचीही तक्रार नसल्याचे पोलीस सुत्राकंडुन मिळालेल्या माहीतीतुन कळाले आहे.