यावल शहरात आज दोन कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळले तर साकळीतील बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग!

यावल

यावल >> शहरातील विरार नगरात दोन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एक २६ वर्षीय तर एक २४ वर्षीय तरुण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, हे दोन तरुण साकळीच्या कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना हा संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.

यावल शहरात रुग्णसंख्या ४४ झाली आहे. फैजपूरात कोरोना रुग्ण ५६ झाले आहेत. तालुक्यातील सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेले हॉटस्पॉट साकळीत रुग्णसंख्या ६३ झाली आहे. यावल तालुक्यातील रुग्णसंख्या एकूण २५५ झाले आहेत. तर १४७ कोरोनामुक्त! तालुक्यात १६ जणांचा कोरोनाने मृत्यू…यावल तालुक्यातील कोरोनाचे उपचार घेत असलेले रुग्ण ९२ आहेत. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *