यावल तालुक्यात कोरोनाचा शिरकाव ; रुग्ण संख्या एकूण पाच : तालुक्याला धोक्याची घंटा!

यावल सिटी न्यूज

जग, देश, राज्य, जिल्हा, तालुका नव्हे तर आता घरात यायला वेळ नाही : कोरोना

मनु निळे यावल : जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला असताना आता देश, राज्य, जिल्हा नव्हे तर यावल शहरासह ग्रामीण भागात सुद्धां कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यावल मध्ये रुग्ण संख्या दोन, त्यात एक पोलिसाची आई आहे तर पोलीस अडावदला कर्तव्यावर असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तसेच ग्रामीण भागात तीन, कोरपावलीला दोन बापलेक व दहीगावला एक अशी रुग्ण संख्या यावल शहरासह ५ झाली आहे.

मिळालेल्या सूत्रांनुसार : यावल शहरात एक 20 वर्षाचा आणि दहीगावला एक वय वर्षे 67 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावल शहरासह ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाने थैमान मांडले आहे. यामुळे तातडीने संबधित रुग्णांच्या परिसरात फवारणी करण्यात आली असून त्यांच्या संपर्कातील लोकांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे.

मिळालेली माहिती अशी कि, प्रशासन वारंवार सांगून सुद्धा नागरिक ऐकत नाहीत हीच आपल्याला भेट म्हणून समजावे असे बोल काही नागरिकांकडून बोलले जात आहेत. बाहेरून आलेले व्यक्ती सर्हास शहरात गावात फिरत असल्याने कोरोना हा विषाणू लवकरच आपल्या घरात यायला वेळ लागणार नाही.

यावल तालुक्यातील सर्व नागरिकांनी आपल्या घरी राहूनच प्रशासनाला सहकार्य करावे अशी आशा सरकारला आहे. शेतकरी वर्ग, शेत मजूर वर्ग यांनी तोंडाला मास्क लावूनच काम करावे, तालुक्यात अनेक ठिकाणी शेतातील मजूर किंवा इतर मजूर वर्ग तोंडाला मास्क न लावता काम करत आहेत. असे निदर्शनास आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *