यावलमध्ये फसवणूकीच्या उद्देशाने लग्न तर नवरीकडून दागिने हस्तगत ; महिलेने नाव बदलल्याने उघड

क्राईम निषेध पाेलिस यावल

यावल प्रतिनिधी >> शहरातील महाजन गल्लीत एका अविवाहित मुलाला तुझे लग्न लावून देते. त्यासाठी मुलीच्या वडिलांना ७० हजार रुपये द्यावे लागतील, अशी बतावणी करत एका महिला एजंटने खोटे नाव सांगून फसवणूक केली होती. याप्रकरणी यावल पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

तपासासाठी यावल पोलिसांनी औरंगाबाद एमआयडीसीतून नवरीच्या घरून भाड्याच्या घरातून सोने-चांदीचे दागिने हस्तगत केले. याप्रकरणी आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास यावल पोलिस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

२१ नोव्हेंबर रोजी यावल पोलिस ठाण्यात महाजन गल्लीतील दिगंबर देविदास फेगडे यांच्या फिर्यादीवरून सोनाली कुऱ्हाडे (वय ३५, रा.दर्गा रोड, परभणी) हिच्या विरुद्ध फसवणुकीसह वेगवेगवळ्या कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता.

लग्न करण्यासाठी दिगंबर फेगडे यांचेकडून सोनालीसह तिचे सहकारी बहिणाबाई रावसाहेब अंधारे (रा.दर्गा रोड, परभणी), रावसाहेब रामचंद्र कोळी, अनिल खुशाल परदेशी (रा.अकलूज, ता.यावल) यांनी ६३ हजार रुपये रोख घेतले.

विठ्ठल मंदिरात लग्न लावून देण्याचा बनाव केला. लग्न लावून दिल्यावर आरोपी सोनाली कुऱ्हाडे ही दिगंबर फेगडे यांच्याकडे नांदण्यास आली.

पाच दिवस सासरी थांबून पती, सासरकडील कोणीही मंडळी घरी नसल्याचे पाहून तिने लग्नात पतीने दिलेले २५ हजार रुपयांचे दागिने, ५ हजार रुपये किमतीच्या साड्या, १३०० रुपयांचा मोबाइल घेऊन पलायन केले.

याप्रकरणी दिगंबर फेगडे यांनी गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, नेताजी वंजारी, भूषण चव्हाण, ज्योती खराटे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. त्यात मध्यस्थांकडून रोख रक्कम, तर औरंगाबाद येथे सोनालीच्या घरातून सोने-चांदीचे दागिने काढून दिले.

दरम्यान, गुन्ह्यातील संशयित सोनाली कुऱ्हाडे हिने वारंवार तिचे नाव बदलले आहे, असे समोर आले. तपासात तीने आतापर्यंत सोनाली कुऱ्हाडे, मंगला आनंदा पवार, मंगलाबाई उर्फ सोनाली राजू शिंदे असे नाव सांगितले. मात्र, तिचे मूळ नाव मंगला आनंदा पवार (रा.आडगाव, ता. यावल) असे निष्पन्न झाले.

पोलिसांनी तिचा चिंचोली शाळेतून बारावी शिक्षण झाल्याचा दाखला उपलब्ध केला. मात्र, तिने १५ वर्षांपासून आडगाव सोडले. असून तिचे वय आज ३५ वर्षे आहे. तिचे अगोदर लग्न झाले असून एक मुलगा, एक मुलगी असे अपत्य आहे. तिने यापूर्वी चिंचोली येथील उमेश प्रल्हाद पाटील यांच्याशी सुद्धा असाच लग्नाचा बनाव केला होता. तेव्हा देखील गुन्हा दाखल झाला होता. त्यात तिला पोलिस कोठडी मिळाली होती.