भारत बंदला यावलमधून संमिश्र प्रतिसाद

Politicalकट्टा आंदोलन कट्टा यावल

यावल प्रतिनिधी >> देशाच्या अन्न पुरवठा करणाऱ्‍यांविरोधात काळा कायदा लादल्याबद्दल दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला यावलमधून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

दरम्यान, आज दि.८डिसेंबर रोजी केन्द्रातील शासनाने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात पारित केलेले शेतकरी विरोधातील काळे कायदे तात्काळ मागे घ्यावे, याकरिता संपुर्ण देशातील लाखो शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असुन आपल्या देशाच्या अन्नदाताला बळ देण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकवटले आहे.

या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी, शिवसेना, कॉग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडी शासनाने या आंदोलनात सहभाग नोंदवुन पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला यावल शहर व तालुक्यात सर्व व्यापारी यांनी आपली दुकाने कडकडीत बंद पाडले आहे. यावेळी भुसावळ टी पॉईटवर करण्यात आलेल्या रस्ता रोकोत चोपडा ते फैजपुर, यावल ते भुसावळ मार्गावरील वाहतुकीचा सुमारे एक तास खोळंबा झाला.