भाजपामध्ये लहानातला लहान कार्यकर्ता आमदार, खासदार, मंत्री व मोठा नेता होऊ शकतो : प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव मुक्ताईनगर यावल रावेर

भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न

मनु निळे ::> भारतीय जनता पार्टी तालुका रावेर-यावल-मुक्ताईनगरची बैठक संपन्न झाली. आज गुरुवार दिनांक २९ रोजी भारतीय जनता पार्टी ची बैठक पार पडली. यावेळी भाजपा प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक यांनी समारोप भाषणात सांगितले की, भारतीय जनता पार्टीचा लहानात लहान कार्यकर्ता आमदार खासदार मंत्री व मोठा नेता होऊ शकतो हे भारतीय जनता पार्टीत शक्य होते. काही घटना घडल्यास पक्ष कार्यकर्त्यांनी खचून न जाता त्यात कार्यकर्त्या मधून नेता तयार होतो असे विजयराव पुराणिक यांनी सांगितले व पदे व्यवस्थापनाचा भाग आहे ते बदलत असते पार्टीचे विचारधारा मधून कायम असते असे त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की भाजपाचा विस्तार हा अधिक जोमाने काम करून, त्याकरता नवीन कार्यकर्ता सुद्धा जोडावे लागणार आहे व ते आपण जोडू तसेच मला पक्षाने दोन वेळा खासदार बनवले सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले.

सदर बैठकीचे प्रास्ताविक भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे यांनी केले. त्यांनी प्रस्ताविक भाषणात सांगितले की भारतीय जनता पार्टीची संघटना मजबूत आहे व ती अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एक दिलाने काम करावे.

भारतीय जनता पार्टी रावेर-यावल-मुक्ताईनगर तालुका विस्तृत बैठकीत मार्गदर्शन केले, यावेळी प्रदेश संघटन मंत्री विजयराव पुराणिक, महाराष्ट्र प्रदेश जनजाती क्षेत्र संपर्क प्रमुख किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे, विभाग संघटन मंत्री रवि अनाजपुरे, रंजनाताई पाटील, शिक्षण सभापती रवींद्र पाटील, डॉ. राजेंद्रजी फडके, ओ. बी.सी. प्रदेश उपाध्यक्ष हर्षल पाटील, डॉ.कुंदन फेंगडे, डॉ. विजय धांडे, सचिन पानपाटील रावेर-यावल-मुक्ताईनगर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.