यावलचा शुक्रवारचा आठवडे बाजार अखेर रद्द

यावल रिड जळगाव टीम

प्रतिनिधी यावल >> जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये यावल शहरात शुक्रवारी भरणारा आठवडे बाजार रद्द झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार रद्द केले आहेत.

याअनुषंगाने यावल शहरात दर शुक्रवारी भरणारा बाजारही रद्द झाला. या संदर्भात नागरिकांना माहिती व्हावी म्हणून पालिकेने शहरात दवंडी दिली. केवळ यावल शहरच नव्हे, तर तालुक्यातील इतरही गावांमध्ये भरणारे आठवडे बाजार रद्द केले आहेत. नागरिक व व्यावसायिकांनी याची नोंद घ्यावी, अशा सूचना दवंडीद्वारे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी दिल्या आहेत.