यावल शहरात मोदी-योगी सरकारचा बैलगाडी मोर्चा काढून निषेध

Politicalकट्टा कट्टा निषेध

यावल ::> केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी संसदेत मजूर केलेले काळे कायदे तसेच उत्तरप्रदेश हाथरस येथील अमानुष घटनेच्या निषेधार्थ यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आ.शिरीष चौधरी, जळगाव जिल्हा परिषद गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली निघाला. आज यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी व कामगार बचाओ दिवस तसेच काळे कायदे रद्द करण्यासाठी शेतकीसंघ यावल येथून शेतकरी बांधवांना सोबत घेऊन बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.

उत्तरप्रदेश येथे तरुणीवर झालेल्या अमानुष बलात्कार आणि हत्यामुळे यावल येथे मेणबत्या पेटवून मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ यांच्या गुंडाराजची बळी पडलेल्या पिडीत तरुणीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर परत तेथून मोर्चा तहसील कार्यलाय यावल येथे आल्यावर खासदार राहुल गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी केलेली धक्काबुक्की आणि असभ्य वागणूक मोदी-योगी यांच्या राज्यात झालेल्या बलात्कार, सामान्य जनतेची पिळवणूक या सर्व घटनाचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *