अट्रावलच्या २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार, बळजबरीने केला गर्भपात

क्राईम निषेध पाेलिस यावल

प्रतिनिधी यावल >> तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत लैंगिक अत्याचार केले. तिला बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले. तसेच लग्नाला नकार दिल्याने संबंधितांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

अट्रावल येथील श्रावण कैलास कोळी याने पीडितेशी परिचय वाढवला. यानंतर विश्वासात घेत तुझ्याशी मी लग्न करेल, असे आमिष दाखवले. तिच्यासोबत १ सप्टेंबर २०१९ पासून ते ५ डिसेंबर २०२० दरम्यान संशयिताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गरोदर झाल्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडले. वर्ष उलटूनही संबंधिताने लग्न केले नाही. पीडितेने लग्नासाठी आग्रह धरल्यावर श्रावण कोळीने लग्नाला नकार दिला. याप्रकरणी पीडितेने यावल पोलिस ठाण्यात कोळीविरूद्ध गुन्हा दाखल केला.