यावल : शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास हिरावला

यावल सिटी न्यूज

यावल ::> बुधवारी झालेल्या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यातील खरीप पिकांसह केळीचे माेठे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भागात चक्रीवादळामुळे पिके जमीनदोस्त झाली आहेत. कापणीयोग्य केळी, ज्वारी, मका व कापूस पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.

कापणी योग्य झालेली केळीचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आधीच ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यातून सावरत असताना शेतकऱ्यांना पुन्हा वादळाचा तडाखा सहन करावा लागला. महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

यावल तालुक्यात वादळी पावसामुळे केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीसंर्दभात बाजार समितीचे सभापती मुन्ना पाटील यांनी चोपडा तालुक्याच्या आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांना माहिती दिली. त्यामुळे आमदार सोनवणे यांनी नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे अशा सूचना तहसीलदारांना केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *