शहीद जवान यश देशमुख यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

Jalgaon Social कट्टा कट्टा चाळीसगाव जळगाव

चाळीसगाव प्रतिनिधी >> श्रीनगरमध्ये हल्ल्यात शहीद झालेल्या चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश डिगंबर देशमुख यांच्या पार्थिवावर आज सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील जवान यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले आहेत. त्यांचे पार्थिव आज सायंकाळी साडेपाच वाजता नाशिक येथे पोहचले आहे. लष्कराची गार्ड टीम आज सकाळी ६ वा. त्यांचे पार्थिव घेऊन नाशिक येथून निघणार असून सकाळी ८. ३० वाजता पिंपळगाव येथे पोहोचणार आहे. त्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.