धुळे ::> धुळे जिल्ह्यात सातव्या आर्थिक गणनेच्या कामास सुरुवात झाली असून, नागरिकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा आर्थिक गणनेचे चार्ज ऑफिसर संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, सातवी आर्थिक गणना केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यान्वयन मंत्रालयातर्फे घेण्यात येत आहे. या गणनेचे क्षेत्रकाम कॉमन सर्व्हिस सेंटर, ई-गव्हर्नन्स यांनी नेमलेल्या प्रगणक व पर्यवेक्षकांमार्फत केले जाते. या गणनेमध्ये सर्व उद्योग, व्यवसाय व सेवा यांची गणना प्रत्यक्ष घरोघरी कुटुंबास उद्योगास भेट देऊन करण्यात येत आहे.
धुळे जिल्ह्यात 26 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश : जिल्हादंडाधिकारी संजय यादव