प्रतिनिधी जळगाव >> फुले मार्केटमध्ये मुलीच्या लग्नासाठी खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून ४२ हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली, मात्र, घरी लग्नाचा उत्सव व कुटुंबियांच्या भितीपोटी त्या महिलेने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली नाही.

नातेवाईकांसह मुलीच्या लग्नाची खरेदी करण्यासाठी शनिवारी ही महिला आली होती. महिलेने फुले मार्केटमधील दुकानातून ८ हजार रुपयांच्या साड्या खरेदी केल्या. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या दोन युवती नातेवाईकांना भेटण्यासाठी चंदुलाल रसवंतीजवळ गेल्या.

खरेदीसाठी त्या महिलेने ५० हजार रुपये सोबत आणलेले होते. ८ हजार रुपयांची खरेदी केल्यानंतर उर्वरित ४२ हजार रुपये त्यांनी पर्समध्ये ठेवलेले होते. खरेदीनंतर दुसऱ्या दुकानाकडे जात असताना गर्दीमध्ये चोरट्याने त्यांच्या पर्समधून ४२ हजार रुपये चोरुन नेले.

त्याआधी कुणीतरी धक्का दिल्याचे त्यांचे लक्षात आले. त्यानंतर पर्स तपासली असता पैसे चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. नंतर महिलेने शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दुकानासमोरील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले आहे. सीसीटीव्ही फक्त नावालाच असल्याने अनेकांना फुले मार्केट मध्ये खरेदी करताना सावधानता बाळगावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *