‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा छळ; ६ जणांवर गुन्हा

Jalgaon क्राईम जळगाव जळगाव जिल्हा धरणगाव निषेध

जळगाव >> ‘तुला मुलीच होतात’ या कारणावरुन विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. गितांजली उर्फ भावना संदीप चौधरी (रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे विवाहितेचे नाव आहे. त्यांना दोन मुली आहेत.

दरम्यान, या कारणावरुन तिचा पती संदीप चौधरीसह सासरच्या ६ जणांनी सातत्याने मारहाण करुन छळ केला. तसेच घर बांधणे व प्लॉट घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली.

या प्रकरणी भावना चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरु १३ जानेवारी रोजी शनिपेठ पोलिस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.