विवाहितेचा छळ; पाच जणांवर केला गुन्हा दाखल

क्राईम धुळे माझं खान्देश

धुळे ::> तालुक्यातील मोराणे येथे माहेर असलेल्या विवाहितेचा सासरी छळ केला. विवाहितेच्या तक्रारीनुसार रवींद्र भरत बागुल यांच्यासोबत २४ एप्रिल २०१५ रोजी विवाह झाला. लग्नात मानपान कमी दिल्याचे कारण पुढे करून पती रवींद्र बागुल, सासरा भरत साहेबराव बागुल, आशाबाई भरत बागुल, सुवर्णा शैलेश सूर्यवंशी, सीमा प्रफुल्ल पाटील यांच्याकडून त्रास दिला जाऊ लागला असे तक्रारीत नमूद आहे. त्यावरून धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.