मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जागतिक महिलादिन उत्साहात साजरा

Politicalकट्टा Social कट्टा कट्टा निवडणूक यावल

रिड जळगाव टीम >> मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये जागतिक महिलादिन निमित्त जिल्हा परिषद सदस्य जळगाव शिक्षण, क्रिडा, आरोग्य विभाग रविंद्र सूर्यभान पाटील ( छोटुभाऊ) व सागर कोळी तालुकाध्यक्ष भाजपा युवामोर्चा यांच्या हस्ते शिक्षिका महिलांचा सत्कार करून उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल यावल ला भेट देऊन सर्व शिक्षकांचा कौतुकादस्पद सत्कार केला.

या कार्यक्रमात त्यांनी महिलांचे आपल्या जीवनातील स्थान आणि त्यांची माहिती सांगितली. या कार्यक्रमाला श्री.सुजित वानखेडे, संस्थाअध्यक्षा नीता गजरे, सचिव धिरज पाटील शिक्षिका मीनल महाजन, साक्षी अग्रवाल, रेश्मा पाटील, शारदा पाटील, कर्मचारी सुनीता वाघ, शारदा पांडव, इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.