पारोळ्यात पाण्याच्या पंपाचा शॉक लागल्याने महिलेचा मृत्यू

अपघात क्राईम पारोळा

पारोळा प्रतिनिधी >>शहरात पेंढारपुरा भागातील ५२ वर्षीय महिलेचा पाण्याच्या पंपाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सरलाबाई हिरालाल महाजन असे मृत महिलेचे नाव आहे.

सरलाबाई मंगळवारी सकाळी १०.३० वाजता नळावरील पंप सुरू करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना शॉक लागला. त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी १ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पारोळा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद झाली.