वरणगाव :> येथील रामपेठ भागातील रहिवाशी असलेल्या एका लघु व्यावसायिकाने गेल्या दोन महिन्यापासुन कोरोना मुळे आपला व्यवसाय बंद असल्यामुळे घरातील आर्थिक परिस्थीती बिकट झाल्याने नैराश्या पोटी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.

कोरोना या जिवघेण्या आजाराने संपूर्ण राज्यात संचारबंदी असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच उद्योग धंदे बंद झाले असल्याने हात मजुरी किंवा लघु व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आली असताना शहरातील रामपेठ भागातील रहिवाशी राजु रामधन ठोंबरे ( ५४ ) यांचा बसस्थानक परिसरात अंडा पाव च गाडी लावुन परिवाराचा गाडा चालवत होते मात्र गेल्या दोन महिन्या पासुन व्यवसाय बंद असल्या कारणाने घरातील परिस्थीती जेमतेम असताना आर्थिक स्थिती बिकट झाल्याने गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात छताच्या हुकाला दोरीचा गळफास अडकवुन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळव्यक्त केली जात आहे. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असुन घटनेचा पुढील तपास सह फौजदार सुनिल वाणी हे करीत आहे.