शॉर्टसर्किटमुळे वरणगावात दोन एकरावरील ऊस खाक ; चार लाखांचे नुकसान

क्राईम भुसावळ वरणगाव

वरणगाव >> शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याने वरणगाव फॅक्टरी रस्त्यावरील शेतात दोन एकरावरील ऊस जळाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

फुलगाव येथील शेतकरी अनिल शालिग्राम चौधरी (वय ५५) यांनी गट नंबर १३५, १३६ मधील शेतात ऊस लावला होता. बुधवारी अचानक शेतातील वीजखांबावर असलेल्या तारांचे दोन झंपर तुटून शॉर्टसर्कीट झाले. त्यामुळे ठिणग्या उडाल्याने दोन एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला उत्पन्नाचा घास आगीमुळे हिरावला गेला आहे. या घटनेची माहिती महावितरणला कळवली आहे.