वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीत २० वर्षीय युवकाची आत्महत्या

आत्महत्या क्राईम भुसावळ वरणगाव सिटी न्यूज

वरणगाव प्रतिनिधी >> वरणगाव फॅक्टरी येथील कर्मचारी वसाहतीमधील टाईप टू क्वार्टर नंबर २७ मधील रहिवासी अजय दिलीप मतकर (वय २०) याने राहत्या घरात पंख्याला साडी बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. अजय मतकर असे मृताचे नाव आहे.

अजय याची आई वरणगाव फॅक्टरीत नोकरीस असून तो आईसोबत राहत होता. तसेच मुक्ताईनगर येथील आयटीआयमध्ये तो शिक्षण घेत हाेता. मंगळवारी दुपारच्या सुमारास आई ड्युटीवर गेली असताना त्याने पंख्याला साडी बांधून गळफास घेतला.त्यात त्याचा मृत्यू झाला. आई घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अजयचा मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला आहे.