वरणगावात २८ वर्षीय विवाहितेची आत्महत्या

भुसावळ वरणगाव

रिड जळगाव >> वरणगाव शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी असलेली २८ वर्षीय विवाहितेने गुरूवारी सकाळी ७ .३० वाजेच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अपेक्षा वैभव देशमुख (२८) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नाही.

शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी असलेले वैभव यंशवतराव देशमुख यांच्या पत्नी अपेक्षा वैभव देशमुख (२८) या विवाहतीने गुरूवार रोजी आपल्या राहत्या घराच्या वरच्या मजल्या वर असलेल्या खोलीतील छताला ओढणी बाधुन गळ्याला गळफास लावुन आत्महत्या केली. या बाबत मयत विवाहतीचे सासरे यंशवतराव शंकरराव देशमुख यांच्या खबरीवरून अकस्मत मृत्युची नोंद करण्यात आली असुन आत्महत्येचे नेमके कारण समजु शकले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *