वरणगावात २३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

क्राईम वरणगाव

वरणगाव प्रतिनिधी ::> येथील गणपती नगरातील मानसिक ताणामुळे आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. सागर भंगाळे (वय २३) असे मृताचे नाव अाहे. या प्रकरणी वरणगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

येथील संजय भंगाळे यांचा मुलगा असलेल्या सागरने मानसिक ताण असह्य झाल्यामुळे पहाटे राहत्या घरातील किचनमधील छताच्या हुकांना दोरी लावून गळफास घेतला. शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस अाली.

अॅड. राजेश शामराव कोळी (रा.गणपती नगर) यांच्या खबरीवरुन वरणगाव पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सागर याचा स्वभाव मनमिळावू व बोलका होता. तसेच त्याचे स्वत:चे गॅरेज होते. वरणगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात अाला. तपास सहाय्यक पाेलिस निरीक्षक हर्षल भोये, फौजदार सुनील वाणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *