वरणगाव : अपेक्षाच्या आत्महत्या प्रकरणी अखेर पतीसह सासरच्या मंडळीवर गुन्हा दाखल

क्राईम वरणगाव

वरणगाव :>> शहरातील मोठी होळी परिसरातील रहिवाशी अपेक्षा वैभव देशमुख या विवाहितेने दि २७ ऑगस्ट शुक्रवार रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या प्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीवर अखेर ३० ऑगस्ट रविवार रोजी संध्याकाळी गुन्हा दाखल करप्यात आला .

याबाबतची मयत विवाहितेचे वडिल हिम्मतराव विश्वासराव देशमुख राहाणार राणा लेआऊट शेरवाडी रोड मुर्तिजापूर यांनी वरणगांव पोलीसांत दिलेली माहिती अशी की तिच्या सासरच्या मंडळींनी तसेच वरणगांव येथे अधुनमधुन येणाऱ्या तिच्या नणंदा यांनी माझ्या मुलीजवळ तिच्या पतीच्या धरती कृषीधन केंद या दुकानात माल भरण्यासाठी दोन लाख रु. ची मागणी केली होती. व त्यासाठी तिला माहेरी पाठवून दिले होते.

मी माझे घर विकून ५० हजार रुपये पाठविले होते. परंतु त्यांनी पूर्ण पैसे घेऊन ये असा तगादा लावला व तिला मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. म्हणून मानासिक त्रास सहन न झाल्यामुळे अपेक्षाने आत्महत्या केली. त्यांनी सासरच्या मंडळीने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप केला आहे त्याप्रकरणी वैभव देशमुख (पती), रजनी यशवंतराव देशमुख ( सासू), यशवंतराव शंकरराव देशमुख ( सासरे ) सर्व वरणगांव तथा ‘ सोनाली स्वप्नील देशमुख (नणंद) अमरावती ‘ दिपाली प्रशांत देशमुख ( नणंद ) रा . येवदा ता . दर्यापूर अशा पाच व्यक्तींवर वरणगांव पोलीसांत गुन्हा नोंद करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *