वरणगाव बोहर्डी शिवारात अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांना पकडले ; २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राईम भुसावळ वरणगाव

वरणगाव ::> येथून जवळच असणाऱ्या बोहर्डी बुद्रुक शिवारातून अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करणाऱ्यांना पोलिसांनी पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेबाबत महसूल विभाग अनभिज्ञ होता. शुक्रवारी रात्री ९ वाजता बोहर्डी बुद्रुक येथून अवैधा गौणखनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर वरणगाव येथे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याबाबत मंडळाधिकारी अधिकारी योगिता पाटील यांना देण्यात आली. त्या माहितीच्या आधारे येथील एपीआय संदीपकुमार बोरसे, पोलिस विवेक चौधरी, राहुल साळुंखे हे बस स्टॉपसमोर थांबले. त्यांनी तेथून जाणाऱ्या ट्रॅक्टरवरील चालक विलास पाटील (रा.बोहर्डी) याच्याकडे चौकशी केली. ही वाळू ठेकेदार सुरेश गोपाळ (रा.बोहर्डी) यांच्याकडून घेतली. मात्र, परवाना नव्हता. त्यामुळे २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जमा करण्यात आला.

मंडळाधिकारी योगिता पाटील यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला. दरम्यान, परिसरातून गौणखनिजाची लूट होत असताना महसूल विभाग मात्र अनिभिज्ञ आहे.