वरणगाव >> शहरातील भंगाळे वाड्यातील रहिवाशी असलेल्या एका नगरसेवकाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या ५० वर्षीय नगरसेवकाने दोन दिवसांपूर्वी स्वॅब दिला होता. तो अहवाल पॉझिटीव्ह आल्याने त्यांना जळगाव येथील कोविड सेंटरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता बाधितांची संख्या ७० झाली आहे.
