वरणगांव आयुध निर्माणी कर्मचाऱ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू

भुसावळ वरणगाव सिटी न्यूज

वरणगाव > येथील आयुध निर्माणी वसाहत मध्ये टाईप थ्री ३ नंबर क्वार्टरला राहणारे जितेंद्र तुळशीराम भोळे (वय ४६) यांचे चक्कर पडल्याने मृत्यु झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ६ .४५. वाजता घडली.

याबाबत माहीती अशी की, जितेंद्र घराजवळ उभे असतांना त्यांना चक्कर आले ते लोखंडी अँगल वर पडले. असता डोक्याला जखम झाली व रक्तस्राव झाला, त्यांना निर्माणी रूग्णालयात नेत असतांना त्यांचा मृत्यु झाला आहे. या घटनेबाबत वरणगांव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयताचे शव विच्छेदन वरणगांव ग्रामिण रुग्णालयात करण्यात आले. मयत जिंतेद्र भोळे फॅक्टरीत ई ई विभागात चार्जमन पदावर कार्यरत होते. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *