अनोळखी महिलेने धावत्या रेल्वेसमोर झोकून केली आत्महत्या

Jalgaon आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

प्रतिनिधी जळगाव >> धावत्या रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देत ४५ वर्षीय महिलेने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना १७ एप्रिल रोजी पाळधी-जळगाव दरम्यान डाऊन लाइनवर घडली. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृत महिलेकडे कुठल्याही प्रकारचे ओळख होईल असे कागदपत्र आढळून आले नाही. त्यामुळे मृतदेह ओळख पटवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ठेवला आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.