अनोळखी तरुणाचा मेहरुण तलावात बुडून मृत्यू

Jalgaon Jalgaon MIDC आत्महत्या क्राईम जळगाव जळगाव जिल्हा

जळगाव >> मेहरुण तलावात बुडून अनोळखी तरुणाचा मृत्यू झाला. ३१ मार्च रोजी सायंकाळी या तरुणाचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या तरुणाचे वय अंदाजे २८ एवढे आहे.

दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस या तरुणाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

गुरुवारी रात्रीपर्यंत ओळख पटलेली नव्हती. मेहरुण परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती देण्यात आली.