चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या तरुणाची आत्महत्या

आत्महत्या क्राईम चाळीसगाव

चाळीसगाव >> चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथील २२ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या केली. बुधवारी (दि.१७) सायंकाळी ४ वाजता ही घटना उघडकीस आली.

राहुल कैलास राजपुत असे मृत तरूणाचे नाव आहे. राहुल याचा चार महिन्यांपुर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात आई, लहान भाऊ व पत्नी असा परिवार आहे. त्याची परिस्थिती गरिबीची होती. सर्पमित्र म्हणुन देखील तो परिसरात परिचीत होता. घटनेमुळे उंबरखेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.