वरणगावात रेल्वेखाली आल्याने अनोळखी व्यक्तीचा ओढवला मृत्यू

भुसावळ वरणगाव

रिड जळगाव टीम ::> वरणगाव येथून जवळच असलेल्या नागेश्वर महादेव मंदिराजवळ ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा रेल्वेखाली आल्याने मृत्यू झाला.

सोमवारी सकाळी ८ वाजेपुर्वी ही घटना घडली. नागेश्वर मंदिराजवळ असलेल्या अप रेल्वे लाइनवर खांब क्रंमाक ४५८/०५ जवळ ही घटना घडली.

मृताची उंची पाच फूट, रंग गोरा, केस काळे, अंगात चौकडी रंगाचा शर्ट, निळी जिन्स पॅन्ट असे वर्णन आहे. याप्रकरणी रेल्वे कर्मचारी रवींद्र बेंडाळे (वय ३२, रा. मच्छिंद्रनगर, वरणगाव) यांच्या खबरीवरून वरणगाव पोलिसात अकसात मृत्यूची नोंद झाली. सहायक फौजदार सुनील वाणी , हवालदार मुकेश जाधव या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *