आदिवासी विकास मंत्री पाडवी आज जळगावात आढावा बैठक घेणार

Jalgaon Politicalकट्टा कट्टा जळगाव

जळगाव ::> आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार असून शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी उपयोजना व क्षेत्राबाहेरील विविध योजनांची आढावा बैठक घेणार आहेत.

दुपारी १ वाजता काँग्रेस भवन येथे भेट देणार आहेत. दुपारी ३.१५ वाजता डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देतील. सायंकाळी ५ वाजता रावेर तालुक्यातील पीडित कुटुंबाला भेट देणार आहेत. सायंकाळी ५.४५ वाजता लोहारा आश्रमशाळेला भेट, सायंकाळी ७ वाजता मुक्ताईनगरला जाणार असून रात्री ८ पर्यंत शासकीय विश्रामगृहात थांबणार आहेत. त्यानंतर नंदुरबारच्या दिशेने रवाना होणार आहेत. दरम्यान, अॅड. पाडवी हे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी दाैऱ्यात संघटनात्मक विषयावर संवादही साधणार अाहेत.